कॉफी

कॉफी
ती कातरवेळ तू मी आणि कॉफी
अजूनही आठवते ती वेळ त्यावेळी
तू मला प्रेमाची कबुली दिली होती.
मी हि तुला घाबरत घाबरत 
माझ्या प्रेमाची कबुली दिली होती.
थरथरत्या हाताने मी तो कॉफीचा
मग उचलून आपण दोघांनी 
एकमेकांना चेअर्स केलं.
मग थरथरत्या ओठाला 
कॉफीचा मग लावला होता.
कॉफी पिता ना अजूनही आठवण येते.
ती आपली भेट.
मेघा...✍️✍️
  

Comments