Posts

चक्रवाढ व्याज

आयुष्याच गणित मांडता मांडता बेरीज वजाबाकी करून झाली. गुणाकार भागाकार झाला. सरासरीच्या तुलनेत खूप  गोष्टी तेथे सोडून दिल्या.  तरी बाकी राहतच आली. उणे अधिक करता करता हातचे त्यात मिळवत गेले. सुख शोधता शोधता दुःख वजा करत गेले. चक्रवाढव्याज सारखे दुःख वाढत जाऊन बाकी राहतच आहे.   मेघा...✍️✍️

तू असताना

तू असताना इथं सारं आलबेल होत. आपण दोघेच पहाटेचा गारवा माझं लिखाण त्या बरोबर तू बनवलेल्या गरमागरम चहा आपण दोघेच तो आनंदी क्षण आपली दिवसभर चाललेली बडबड रेडिओ त्यावर दिवसभर जुनी गाणी संध्याकाळी फिरायला जाणे. आपलं पिल्लू त्यांच्या बाळलिला त्यात कसा वेळ जायचा कळत नव्हतं. माझं चिडणे रागावणे तू मात्र शांतच माझा हट्टी स्वभाव. तू चहाच्या बाहण्याने येऊन बोलणं सारं कसं आलबेल होत. तू जाण्याने आता मनात  फक्त खळबळ आहे. खळबळ आहे. मेघा...✍️✍️

सखी आलबेल आहे

सखी सारं काही आलबेल आहे. असं दाखवत असते. तुझ्या मनात आता तून किती खळबळ आहे हे मात्र सांगत नाही. किती त्रास करून घेतेस स्वतःला सांगून मोकळी हो ग डोळ्यातील पाणी लपून हसत असते. जखमेच्या खपली खाली जखम ठसठसत ठेवते. अजून किती सहन करणार विचार करून करून डोकं तुझं दुखतं तेव्हा डोळ्यांत पाणी दाटून शांत बसते. अशामुळे त्रास तुलाच होतो. हसतखेळत राहा ग मी सगळं समजू शकतो ग. हसत खेळत स्वता:साठी जग ग. तुझं आठवणीच गाठोडे जपून मनाच्या तळाशी घट्ट बांधून ठेवून दे. मेघा...✍️✍️

कॉफी

कॉफी ती कातरवेळ तू मी आणि कॉफी अजूनही आठवते ती वेळ त्यावेळी तू मला प्रेमाची कबुली दिली होती. मी हि तुला घाबरत घाबरत  माझ्या प्रेमाची कबुली दिली होती. थरथरत्या हाताने मी तो कॉफीचा मग उचलून आपण दोघांनी  एकमेकांना चेअर्स केलं. मग थरथरत्या ओठाला  कॉफीचा मग लावला होता. कॉफी पिता ना अजूनही आठवण येते. ती आपली भेट. मेघा...✍️✍️   

सांजवेळ

सांजवेळी उन्हे उतरते तू मला भेटशील का भेटून सख्या जीव  मला लावशील का  मेघा...✍️✍️