तू असताना
तू असताना इथं सारं आलबेल होत.
आपण दोघेच पहाटेचा गारवा
माझं लिखाण त्या बरोबर
तू बनवलेल्या गरमागरम चहा
आपण दोघेच तो आनंदी क्षण
आपली दिवसभर चाललेली बडबड
रेडिओ त्यावर दिवसभर जुनी गाणी
संध्याकाळी फिरायला जाणे.
आपलं पिल्लू त्यांच्या बाळलिला
त्यात कसा वेळ जायचा कळत नव्हतं.
माझं चिडणे रागावणे तू मात्र शांतच
माझा हट्टी स्वभाव.
तू चहाच्या बाहण्याने येऊन बोलणं
सारं कसं आलबेल होत.
तू जाण्याने आता मनात
फक्त खळबळ आहे.
खळबळ आहे.
मेघा...✍️✍️
Comments
Post a Comment