चक्रवाढ व्याज
आयुष्याच गणित मांडता मांडता
बेरीज वजाबाकी करून झाली.
गुणाकार भागाकार झाला.
सरासरीच्या तुलनेत खूप
गोष्टी तेथे सोडून दिल्या.
तरी बाकी राहतच आली.
उणे अधिक करता करता
हातचे त्यात मिळवत गेले.
सुख शोधता शोधता
दुःख वजा करत गेले.
चक्रवाढव्याज सारखे दुःख
वाढत जाऊन बाकी राहतच आहे.
मेघा...✍️✍️
Comments
Post a Comment