सखी आलबेल आहे

सखी सारं काही आलबेल आहे.
असं दाखवत असते.
तुझ्या मनात आता तून किती
खळबळ आहे हे मात्र सांगत नाही.
किती त्रास करून घेतेस स्वतःला
सांगून मोकळी हो ग
डोळ्यातील पाणी लपून
हसत असते.
जखमेच्या खपली खाली
जखम ठसठसत ठेवते.
अजून किती सहन करणार
विचार करून करून
डोकं तुझं दुखतं तेव्हा
डोळ्यांत पाणी दाटून शांत बसते.
अशामुळे त्रास तुलाच होतो.
हसतखेळत राहा ग
मी सगळं समजू शकतो ग.
हसत खेळत स्वता:साठी जग ग.
तुझं आठवणीच गाठोडे जपून
मनाच्या तळाशी घट्ट बांधून ठेवून दे.

मेघा...✍️✍️


Comments